मराठा आरक्षणाचे विधेयक २९ नोव्हेंबरला विधिमंडळात मांडणार- मुख्यमंत्री

Foto

मुंबई- राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर आता राठा आरक्षणाचे विधेयक २९ नोव्हेंबर रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडणार असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्य सरकार मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी म्हणजेच 28 नोव्हेंबर रोजी विधानसभेत तर गुरुवारी २९ नोव्हेंबरला विधानपरिषदेत मांडणार असल्याची माहिती होती. परंतु आता विधानसभा आणि विधानपरिषदेत एकाच दिवशी विधेयक मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मागासवर्ग आयोगाच्या अहवाला सादर केल्यानंतर ही सरकार विधेयक सभागृहात का मांडत नाही असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला होता. त्यामुळे सरकार आता मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात मांडणार आहे.

मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्यता आहे.